कणकवली | मयुर ठाकूर : जनसामान्यांचे आधारवड असलेले कणकवली उपजिल्हा रुग्णालय. डॉक्टरांअभावी अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले होते. रुग्णांचे प्रचंड हाल होत होते. तर उपजिल्हा रुग्णालयात जो उपचार मिळायला पाहिजे तो मिळत नव्हता, अशी परिस्थिती कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची झाली होती. मात्र याबाबत अनेक वेळा आम. नितेश राणे यांच्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रतिक्रिया पोहोचल्या आणि आम. नितेश राणेंनी जनतेला दहा दिवसांत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणि वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध होतील.
आ. नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासह वैभववाडी रुग्णालयात सोमवार दिनांक ६ मार्च २०२३ पासून डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणारे कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर पदे रिक्त असल्यामुळे खेड्यातील गरजू रुग्णांची गैरसोय होत होती. आ. नितेश राणे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे भरण्याबाबत मागणी केली होती.
आ. नितेश राणे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट डॉ. सतीश पवार आणि डॉ. ऐश्वर्य शेळके सोमवार ६ मार्च रोजी रुग्णसेवेत दाखल होणार आहेत तर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात डॉ. धर्मेश हे रुजू झाले असून डॉ. कदम हे रुजू होणार आहेत. आणखी ४ वैद्यकीय अधिकारी येत्या आठ दिवसांत नियुक्त केले जाणार सर्वसामान्य रुग्णांची होणारी परवड दूर होणार आहे. जनसामान्य रुग्णांमधून आ. नितेश राणेंचे आभार मानले जात आहेत.





