वैभव नाईक यांनी केली कुडाळ शाखा अभियंता विनायक चव्हाण यांच्या बदलीची मागणी…!

vaibhav

बिले करताना हेतू पुरस्कर त्रास दिल्यास आ. वैभव नाईक करणार पोलखोल…!

कुडाळ : जि. प. बांधकाम कुडाळ उपविभाग येथे कार्यरत शाखा अभियंता विनायक सुर्यकांत चव्हाण यांच्याबाबत अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी, ठेकेदार तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून येत आहेत. अंदाजपत्रके वेळेत न करणे, झालेल्या कामांचे मूल्यांकन वेळेत न करणे, काम सुरु करते वेळी कामावर भेट देण्यास टाळाटाळ करून विलंब करणे आशा प्रकारच्या तक्रारी चव्हाण यांच्याबाबत असल्याने तसेच यामुळे विकासकामे वेळेत पूर्ण करण्यास अडथळे निर्माण होत असल्याने त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी आणि त्यांच्या जागी ओरोस येथील शाखा कार्यालयात शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले श्री जी.व्ही. कडुलकर यांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी आमदार वैभव नाईक तसेच कुडाळ तालुका ठेकेदार संघटना यांनी पत्राद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे .