….आणि संसदेतील शिवसेना कार्यालयात लागले गुरू-शिष्याचे फोटो…!

मुंबई : संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलल्याचे आज पहायला मिळाले. संसदेतील शिवसेना कार्यालयातील यापूर्वी असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब झाल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटो ऐवजी आता संसदेतील शिवसेना कार्यालयात स्वर्गीय आनंद दिघे व शिवसेनेचे एकनाथ शिंदे या गुरुशिष्यांचे फोटो कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आले आहेत.

या आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो संसदेतील शिवसेना कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर झालेल्या राजकीय उलथापालथिनंतर संसदेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर शिवसेना संसदेतील शिवसेना कार्यालयाच्या भिंतीवरील फोटो ठाकरे यांचे फोटो हटवून त्या जागी आता एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो शिवसेना संसदीय कार्यालयात लागल्याने संसदेतील शिवसेना कार्यालयाचे चित्र बदलण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर गल्ली ते दिल्ली फरक जाणवू लागला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे यांनी ताबा घेतला त्यानंतर आता हा बदल दिसून आला आहे. आधी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो होते. आधीच्या रचनेतून या दोघांचे फोटो काढण्यात आले आहेत.