कणकवलीतील जिनिषा सांबरेकर हिचे निधन…!

253

कणकवली : कणकवली बाजारपेठेतील कु. जिनिषा भाई उर्फ रविंद्र सांबरेकर (वय ३२) हिच कोल्हापूर (हातकणंगले) येथील राहत्या घरामध्ये सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तिच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

एमसीए शिक्षण पूर्ण करून ती सध्या हातकणंगले येथे एका कंपनीत नोकरीस होती. आपल्या मैत्रिणींसोबत तेथे राहत होती. सायंकाळी कामावरून आल्यानंतर ती आपल्या रूममध्ये एकटी झोपली होती. त्यानंतर काही वेळाने मैत्रिणी ही रूमवर आल्या मात्र दरवाजा उघडत नसल्याने व फोन ही उचलत नसल्याने दरवाजा तोडून पाहिले असता ती बेडवर झोपलेल्या अवस्थेत होती. तिला उठवले असता ती उठत नसल्याने तिला नजीकच्या रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले.

यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सोनी नावाने परिचित जिनिषा मनमिळावू आणि धाडसी स्वभावाची होती. आपल्या भावंडांना तसेच सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणारी होती. ती चांगली बास्केट बॉल खेळाडू होती. तिच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, काका, काकी असा परिवार आहे. मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते महेंद्र सांबरेकर व कणकवली नगरपंचायत माजी नगरसेविका माया सांबरेकर यांची ती पुतणी होत.