दर्यापूर येथे ट्रॅक्टर ट्रॉली झाली पलटी | अपघातात २२ विद्यार्थी जखमी, दुर्घटना कॅमेरात कैद

185

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर जैनपूर येथे सुरू होते. या शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. मात्र शिबीराचा समारोप झाल्यानंतर चक्क विद्यार्थ्यांना एका ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये बसवून दर्यापूर येथे येत असतांना धोक्याचे वळण असलेल्या स्त्यावर ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी झाली. या अपघातात २२ विद्यार्थी जखमी झाले.

जखमी विद्यार्थ्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.