देशात पुन्हा मोदी सरकार येवो यासाठी घातले विठ्ठलाकडे साकडे…!
जागा उपलब्ध झाल्यास पंढरपुरात वारकरी भक्तांसाठी गोवा भवन बांधणार…!
पंढरपूर : गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी आपण विठ्ठलाकडे 2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे सरकार देशात येऊ दे… असे मागणे मागितले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने पंढरपुरात जागा उपलब्ध करून दिली, तर गोवा राज्य सरकारच्या वतीने गोव्यातील नागरिकांसाठी आणि पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी गोवा भवन बांधणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या दौऱ्यामध्ये विविध पक्षातील आमदार – माजी आमदार यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी आपल्या भेटीमुळे जर काही लोक माझ्या पक्षात येत असतील. आणि त्याचा माझ्या पक्षाला फायदा होत असेल, तर निश्चितच सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी आश्वस्त केले.





