तिलारी पाटबंधारे प्रकल्पासाठीचा निधी फक्त ठेकेदारांचे लाड पुरवण्यासाठी | कारवाई होत नसेल तर आंदोलनाचा इशारा : बाबुराव धुरी

दोडामार्ग : तिलारी पाटबंधारे प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला. मात्र त्याठिकाणी न वापरता फक्त ठेकेदारांचे लाड पुरवण्यासाठी वेगळ्या ठिकाणी वापरण्यात आला आहे. आयी वझरे माटने या गावासाठी मंजूर झालेला निधी कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांनी प्रशासनाची पूर्णपणे दिशाभूल करून गरज नसताना काम सुरू केले आहे.

कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई होत नसेल तर आयी वझरे माटने गावातील ग्रामस्थांना घेऊन ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्याठिकाणी आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे.