डिगस माध्यमिक विद्यालय, डिगस येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. पुष्पसेन (नाना) सावंत यांचा तृतीय स्मृतिदिन साजरा…!
कुडाळ : श्री कालिका प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ, डिगस, संचलित डिगस माध्यमिक विद्यालय डिगस येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. पुष्पसेन (नाना) सावंत यांचा तृतीय स्मृतिदिन मंगळवारी साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. नाना सावंत यांच्या आठवणींना उजाळा देवून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी माजी आमदार स्व. पुष्पसेन उर्फ नाना सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी संस्था अध्यक्ष तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, जि. प. चे माजी गटनेते नागेंद्र परब, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी पं. स. सदस्य अतुल बंगे, माजी उपसभापती जयभारत पालव, डिगस सरपंच पूनम पवार, संस्था उपाध्यक्ष विठ्ठल पवार, संचालक रामचंद्र घोगळे, संजय तावडे, मोहन गावडे, मुख्याध्यापक दीपक आळवे, उपसरपंच मनोज पाताडे, सिंधुमित्र रक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सोसायटी सेक्रेटरी दीपक चेऊलकर, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, प्रगतशील शेतकरी संदिप राठोड, युवासेना शाखाप्रमुख रूपेश पवार, बाळा राणे, अनुजा अमरसेन सावंत, अनुपसेन सावंत, कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शहरप्रमुख संदिप म्हाडेश्वर, ओबीसी सेल शहरप्रमुख राजू गवंडे, उदय धावले, गुरूनाथ पवार, नाथा राणे, मंदार कोठावळे, दशरथ गोसावी, ग्रा. पं. सदस्या स्नेहा चव्हाण, राजश्री गुरव, साक्षी सावंत, भांबाळे, मेस्त्री, बबन चव्हाण, शिक्षक राणे आदिंसह अमरसेन सावंत मित्रमंडळाचे सदस्य तसेच माजी आमदार पुष्पसेन सावंत प्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
अमरसेन सावंत म्हणाले, स्व. नाना यांनी दिलेले संस्कार आणि त्यांचा आदर्श आत्मसात करून आम्ही वाटचाल करीत आहोत. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा असाच अखंडपणे चालू ठेवणार आहोत. विद्यार्थ्यांच्या वतीने हरिषा पवार, मानसी सावंत, साक्षी सावंत, विश्वास आंगणे व अनुष्का पवार यांनी स्व. नानांच्या यशस्वी वाटचालीचा मनोगतातून आढावा घेतला. संस्थेच्या वतीने देण्यात येणारा माजी आमदार स्व. पुष्पसेन सावंत स्मृती कृषीमित्र पुरस्कार डिगस गावातील प्रगतशील शेतकरी संदिप पुंडलिक राठोड यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच विविध स्पर्धांतील विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक मुख्याध्यापक दीपक आळवे, सूत्रसंचालन अनुजा सावंत यांनी केले. आभार एस. पी. प्रभाळे यांनी मानले.





