शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी ११ संशयितांची जामीनावर मुक्तता…!

कुडाळ नायब तहसीलदार व तलाठी मारहाण | प्रत्येकी १५ हजाराचा जामीन मंजूर

कुडाळ : येथील नायब तहसीलदार व तलाठी यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी तब्बल ११ संशयितांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. ही घटना १ फेब्रुवारीला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी नायब तहसीलदार हजारे व तलाठी राठोड यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार संशयीतांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. तर आज त्यांना प्रत्येकी पंधरा हजाराचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. याकामी ॲड. संग्राम देसाई, ॲड. सुहास सावंत, ॲड. अविनाश परब, ॲड. यतिश खानोलकर, ॲड. चैतन्य परब व ॲड. सुशांत घाडीगावकर यांनी काम पाहीले.

बेकायदेशीर वाळु उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करत असताना संशयितांनी ही मारहाण केली होती. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार संशयित अक्षय वालावलकर, गौरव ठाकुर, अमोल ठाकुर, अंकीत नाईक, स्नेहांकीत बांदकर, वैभव देसाई, जागृत परब, साईराज अणावकर, संतोष मठकर,बिनयकुमार सिंग, संदीपकुमार सिंग आदींना अटक करण्यात आली होती. तर आज त्यांची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली.