स्वराज्य युवा मित्रमंडळ दांडेली-आरोस व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…! 

118

सावंतवाडी : स्वराज्य युवा मित्रमंडळ दांडेली – आरोस व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस कोंडुरा तीठा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी रक्तदान शिबिराचे उदघाटन आरोस सरपंच शंकर नाईक, दांडेली सरपंच निलेश मोरजकर, माजी पं.स. सभापती संदीप नेमळेकर, उपक्रमशील शिक्षक तानाजी खोत, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी – दोडामार्ग – वेंगुर्ला विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, तालुका सचिव बाबली गवंडे, योगेश नाईक, विश्वनाथ खोत, आपा खोत, तुकाराम खोत, सुनील शेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी माजी सभापती संदीप नेमळेकर यांनी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करतांना संजय पिळणकर हे जीएमसी (गोवा) रक्तपेढीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदान शिबिरे घेत असल्याने विशेष कौतुक केले. तर संजय पिळणकर यांनी स्वराज्य मित्रमंडळ या संस्थेचे कार्य हे अभिनंदनीय असून याठिकाणी जीएमसीचे रक्तदान शिबीर घेण्यासाठी या तरुणांनी पुढाकार घेतल्यास सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्यावतीने सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी खोत यांनी केले तर आभार मंडळाचे अध्यक्ष शिवम बोन्द्रे यांनी मानले.