सावंतवाडी : आम्ही भारतीय आणि श्रीराम वाचन मंदिराच्या वतीने आज अनोखी सामाजिक सलोखा जपणारी, सर्वधर्मसमभाव जपणारी शिवजयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वसमावेशक विचार, सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन स्वराज्याची कशी स्थापना केली याबबत मान्यवरांनी आपले विचार मांडले.

आज शिवाजी महाराजांना केवळ एका जातिधर्मात बंधिस्त केलं जात आहे. त्यांच्या विचारांऐवजी प्रतिमांचे पूजन केले जात असल्याची खंत वक्त्यांनी व्यक्त केली.

छत्रपतींच्या स्वराज्यात शत्रुपक्षाच्या स्त्रियांचाही सन्मान राखला जाई हे सांगताना आजच्या परिस्थितीशी त्याचे संदर्भ सांगितले.

शिवप्रतिमेला वंदन करून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर डाॅ. जी ए बुवा, फादर मिलेट, मेनुद्दिन करोल, सुरेश गवस, जहागीर बेग, अॅड. संदीप निंबाळकर, वंचितचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक आदि उपस्थित होते.





