दोडामार्ग इथं उद्या रक्तदान शिबीर…!

दोडामार्ग : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान – सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग आयोजित गुरुवार दि. ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दोडामार्ग येथे जी.एम.सी. गोवा यांच्या सहकार्याने लक्ष्मीबाई सिताराम हळबे, महाविद्यालय, आ.दीपकभाई महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान होय. त्यामुळे या अभियानात आपण सर्वांनी सहभागी व्हावे. जी.एम.सी. गोवा रक्ताचा पुरवठा होणाऱ्या वैद्यकीय सेवा येथे रक्ताची आवश्यकता असल्याने अनेक रक्तदान शिबिर आयोजित करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी ह्या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान-सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग यांनी केले आहे.