कणकवली : कणकवली तालुक्यात संजय राऊत यांनी एन्ट्री झाली. दरम्यान कणकवली पटवर्धन चौकातील बॅनर बाजी वरून राजकीय वातावरण टाईट झाले होते. मात्र पडवे येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना भाजप कार्यकर्त्यांबाबत अरे उच्चाराल तर मागे जाऊ देणार नाही असा इशारा नारायण राणे यांनी दिला होता. दरम्यान सायंकाळी आम. नितेश राणे व कार्यकर्त्यांनी पटवर्धन चौकात जोरदार घोषणबाजीसह फटाक्यांची आतिषबाजी केली.
दरम्यान आ. राणे म्हणाले , बाळासाहेब ठाकरे हे आज जिथे कुठे असतील त्यांना निश्चितच आनंद झाला असेल. त्यांचा मुलगा व नातवाने जे त्यांचं नाव आज धुळीस मिळवायचा काम केलं त्या दोघांना देखील आज चपराक बसली असल्याचा टोला आ. नितेश राणे यांनी लगावला.
कनेडी पॅटर्न राबवणार या राऊत यांच्या इशाऱ्यावर देखील राणे यांनी त्यांचा समाचार घेतला. मात्र आम्हाला जिल्ह्यात शांतता हवी असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी श्री. राणे यांनी इलाका भी हमारा और धमाका भी हमारा असे सांगत शिवसेनेच्या त्या टॅग लाईनला उत्तर दिले. जल्लोष करताना सुरुवातीलाच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर मिश्किल हसून टोला देखील लगावला.
राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाची युती असताना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतल्यानंतर योगायोगाने आजच या पटवर्धन चौकात खासदार संजय राऊत यांची कॉर्नर सभा झाली त्याच पटवर्धन चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्यासह फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष केला.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, शिशिर परुळेकर, विराज भोसले, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोंदे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, आशिये सरपंच महेश गुरव, पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, प्रज्वल वर्दम, बबलू सावंत, अजय गांगण, बाबू गायकवाड, किशोर राणे, तेजस लोकरे, राजा पाटकर, विजय चिंदरकर, यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





