शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस दयासागर छात्रालयात केक कापून साजरा

34

 

बांदा (मंगल कामत)

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस दयासागर छात्रालयात केक कापून साजरा

शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांचेकडून सीसीटीव्ही कॅमेरा भेट

शिवसेना जिल्हा प्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस अनेक ठिकाणी अनेक समाज उपयोगी उपक्रमानी साजरा झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आपल्या दातृत्वाच्या गुणाने अनेक संस्था व लोकांसाठी आवश्यक असे कार्यक्रम केले .
रोणापाल येथील दयासागर छात्रालय या गरीब व गरजू मुलांच्या संस्थेला त्याने यापूर्वी अनेक वेळा मदत केली आहे तसेच त्यांच्या या वाढदिवसानिमित्त उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांच्याकडून सीसीटीव्ही कॅमेरा किट देण्यात आले आहे संस्थेच्या वतीने सर्व दात्यांचे आभार मानण्यात येत आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडी तालुकाप्रमुख बबन राणे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी संजय गांधी निराधार समिती सदस्य गजानन नाटेकर रोणापाल माजी सरपंच उदय देऊळकर प्रकाश गावडे राजन परब उदय गावडे राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी बबन राणे यांनी बोलताना संस्थेबद्दल गौरव उद्गार काढले अखिल भारतीय सेवा अभियान या संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या या दयासागर छात्रालयात मुला ंवर योग्य ते संस्कार होऊन मुले अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत भविष्यात या संस्थेसाठी आपल्याकडून व संजू परब यांचे कडूनकायम सहकार्य लाभेल असे मग व्यक्त केले.माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी अखिल भारतीय सेवा अभियान अंतर्गत चालवण्यात येणारे हे दयासागर छात्रालय म्हणजे आपल्या सर्वांचे एक वैभव आहे यामध्ये शिस्त आणि शिक्षण देऊन गरीब गरजु मुलांसाठी योग्य ती दिशा दाखवण्यात येत असल्यामुळे या संस्थेचे तसेच या छात्रालयातील सर्व सेवाभावी कर्मचाऱ्यांचे त्याने खूप कौतुक केले भविष्यात या छत्रालयासाठी अनेक प्रकारे जी काय मदत करता येईल ती आम्ही सर्वजण मिळून करणार असे ग्वाही ही त्यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार दयासागर छात्रालयाचे व्यवस्थापक जीवबा वीर यांनी मानले.