अक्कलकोट (सेंदाप्पा इंगळे)
अक्कलकोट समर्थनगरी परिवार आयोजित श्रावणमासातील स्वामीनामस्मरण सोहळ्यास मिळतोय भक्तांचा उस्फुर्त प्रतिसाद
पवित्र श्रावणमास निमित्त समर्थनगरी परिवाराच्या वतीने पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत महिनाभर अखंड स्वामीनामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ४८३ साधकाने सहभाग घेतला आहे . दररोज १८ तास आपल्या घरी बसून दिलेल्या वेळेनुसार अखंडनामस्मरण केले जाते. महिन्याला ५४० तास इतका मोठा सोहळा संपन्न होत आहे .
श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोटहून समर्थनगरी प्रतिष्ठानच्या वतीने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे, श्री स्वामीभक्त चोळपा महाराज यांचे वंशज वे.शा. सं. अण्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांच्या नियोजनेनुसार विश्वशांती व मनशांती करिता राज्यभरामध्ये नामप्रसारसेवा, एकत्रित नामस्मरण सोहळा, साधना वर्ग ,ललिता पंचमी उत्सवसह लिखित नामजप सोहळा ,पारायण आदिचे आयोजन करण्यात येते .
श्रावणमासामध्ये अखंड स्वामीनामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .
” शिव हर शंकर, नमामि शंकर ,शिव शंकर शंभो, हे गिरीजा पती भवानीशंकर, शिव शंकर शंभो” स्वामी महाराजांच्या या मंत्रास अनुसरून समर्थनगरी पुणे – सातारा शाखेच्या वतीने राज्यभरात राज्याध्यक्षा वनिताताई झेंडे, कार्याध्यक्षा वीणाताई कामटे ( पुणे ), राजश्रीताई बाबर (सातारा ), सुधाताई कोळेकर व सहकार्यांच्या माध्यमातून राज्यभरामध्ये श्रावणमास निमित्त पहाटे पाच ते रात्री अकरा पर्यंत अखंड स्वामीनामजप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ४८३ साधकांनी सहभाग घेतला आहे .
नामजपाचे नियोजन पहाटे ५:०० ते रात्री ११:०० सुमारे १८ तास नामस्मरण होतो . प्रत्येक साधक अर्धा तासआपल्या ठराविक वेळेत नामस्मरण करतो . अर्ध्या तासात एका टप्प्यात २३ साधक याप्रमाणे दिवसभरात ४८३ साधक नामस्मरण करतात. श्रावणमास अखेर ५४० तास नामस्मरण सोहळा संपन्न होणार आहे.
नामस्मरणाच्या माध्यमातून स्वामी संदेश देण्याचे कार्य करणारा समर्थनगरी परिवार आहे . नामप्रसार सेवेसह सामाजिक बांधिलकी जपत “हम गया नही जिंदा है “ही योजना व श्रावणमासात अखंड नामस्मरणसेवेचे आयोजन करून नवनवीन भक्तांना या नामाची गोडी लावण्याचे कार्य खूप महत्त्वाचे आहे . स्वामींच्या आवडीचे कार्य होत असून सर्व भक्तांनी स्वामी सेवेत सहभागी व्हावे . = वे.शा. सं. अण्णू महाराज ( श्री स्वामीभक्त चोळाप्पा महाराज वंशज – श्री स्वामी समर्थ समाधी मठ, अक्कलकोट )
अखंड तेवत असणारी ज्योत .
स्वामींचा कृपाशीर्वाद असलेले नगरी म्हणजे वावगे ठरणार नाही .अक्कलकोटहून अध्यात्माचे कास जोडण्याचे कार्य समर्थनगरी परिवार करीत आहे . याचे समाधान वाटते . प्रत्येक शहरात, गावात, सोसायटीमध्ये भक्तांना एकत्रित करून नामस्मरणाची सामूहिकगोडी लावण्याचे कार्य कलियुगामध्ये खूप महत्त्वाचे आहे. श्रावण मासातील अखंड नामस्मरण सोहळ्याचे आयोजन म्हणजे अखंड तेवत असणारी ज्योत आहे . स्वामी नामाची महिमा खूप मोठी असून योग्य मार्गाने घेऊन जाण्याचे कार्य समर्थ नगरीच्या वतीने होत आहे .याचे समाधान वाटते . श्री महेश इंगळे (चेअरमन – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट )
हा सोहळा पूर्णत्वास नेहण्याकरिता समर्थ नगरी परिवारातील सर्व साधक करित आहेत .





