सावंतवाडी (प्रतिनिधी)
व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा एम.एस.ए.टी. विभाग तर्फे वृक्षारोपण
बांदा येथील व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल,बांदा मधील एम.एस.ए.टि. विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. या विभागातील गार्डनिंग व नर्सरी विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक म्हणून आवळा कलम, रक्तचंदन अशा झाडांचे वृक्षारोपण केले. या प्रशाळेतील सदर विद्यार्थी दरवर्षी क्षेत्र भेट अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे भेट देत या नर्सरी व फळबाग लागवड यांची माहिती घेत असतात. इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थी या विषयाचा अभ्यास करत आहेत. वृक्षारोपण करण्यासाठी यासाठी लागणारे गांडुळ खत सुद्धा मुलांनी याच विभागातून प्रात्यक्षिक अंतर्गत बनवले आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थी या प्रात्यक्षिकातून घेत आहेत. यावेळी समन्वयक राकेश परब, निदेशक भूषण सावंत, निदेशिका रिया देसाई, गायत्री देसाई उपस्थित होते.





