दोडामार्ग : धाटवाडी येथील प्रसिद्ध असलेल्या श्री राष्ट्रोळी सिद्धेश्वर देवस्थानचा २० वा वर्धापन व महाशिवरात्रोत्सव आज दिनांक १३ फेब्रुवारी पासून सुरू होत असून
या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच दुपारी महाप्रसाद रात्रौ विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून हा नवरात्रोत्सव शनिवार १८ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे, तरी श्री दर्शनाबरोबर, महाप्रसाद व संस्कृतीक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक राष्ट्रोळी सिद्धेश्वर देवस्थान कमिटीने केले आहे.





