घारपी स्वामी समर्थ मठात आज गुरुपौर्णिमा उत्सव

15

 

बांदा (प्रतिनिधी)

घारपी स्वामी समर्थ मठात आज गुरुपौर्णिमा उत्सव

     
घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरूवार १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्त मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी १० वाजता अभिषेक व नामस्मरण, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामीभक्त विजय गावकर यांनी केले आहे .