मळेवाड कोंडुरे देऊळवाडी येथील हल्लेखोर बिबट्या लवकरच होणार जेरबंद, वन विभाग ची सुरू आहे कारवाई
सावंतवाडी तालुक्यातील मळेव्हाड कोंडुरे देवगड येथील काल बिबट्याने चार जणांवर हल्ला करत त्यांना जबर जखमी केले होते.यानंतर सदर बिबट्या हा त्याच ठिकाणी दबा धरून बसल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केल्यानंतर वनविभागणे त्या बिबट्याला शोधण्याकरिता शोधमोहीम सुरू केली. काल काळोख पडल्याने शोध मोहिम थांबवण्यात आली आणि पुन्हा सकाळी शोध मी सुरु केली असता बागेमधील एका केबिनमध्ये बिबट्या आढळला असून त्याला पकडण्यासाठी वनविभाग अथक परिश्रम करत असून लवकरच सदर बिबट्याला पिंजऱ्यामध्ये कैद करण्यात येईल.काल चार जणांना हल्ला करून जखमी केल्याची माहिती मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना दिल्यानंतर राणे यांनी वनविभागच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ सदरच्या बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले होते.