बांदा नट वाचनालय येथे विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा

20

  बांदा. (प्रतिनीधी)

बांदा नट वाचनालय येथे विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा

बांदा नट वाचनालय येथे विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी वाचनालयाचे सचिव राकेश केसरकर, संचालक शंकर नार्वेकर प्रकाश पाणदरे, सुधीर साटेलकर महिला संचालिका सौ स्वप्निता सावंत यांच्यासह अनंत भाटे, अंकुश माजगावकर, अशोक आईर आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

           अनंत भाटे यांनी विल्यम शेक्सपियर लिखित विविध साहित्याची ओळख करून देताना उपस्थितांना वाचन करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुंबई येथील भास्कर उर्फ बाळ अनंत कशाळीकर यांनी नट वाचनालयाला देणगी स्वरूपात दिलेल्या विविध वाचनीय पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी वाचक, ग्रंथालयातील कर्मचारी उपस्थित होते.