कणकवलीत कार आणि एसटी बसमध्ये तिहेरी अपघात | कारचे मोठे नुकसान

108

कणकवली : शहरातील नॅशनल हायवेवरील गांगो मंदिर सर्व्हिस रोडवर पुढे जात असलेल्या आय टेन कार ला मागून एसटी बसने जोरदार धडक दिली. त्यानंतर अपघातग्रस्त कार पुढे जात असलेल्या दुसऱ्या एसटी बसवर आदळून तिहेरी अपघात घडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कणकवली शहरातील गांगो मंदिर नजीक सर्व्हिस रस्त्यावर रविवारी दुपारी ३ वाजता. अपघात घडला. डॉ. नयना शेट्टी ह्या आपली आय टेन कार एम. एच. ०७ ए.जि ४३७८ घेऊन कलमठ च्या दिशेने जात होत्या.

दरम्यान त्या गांगो मंदिर जवळ आल्या असता गतिरोधकावर पुढे एक बस चालत होती. एवढ्यातच शेट्टी यांच्या मागाहून येणाऱ्या पणजी – कोल्हापुर एसटी बसची जोरात धडक बसली. त्यानंतर शेट्टी यांची कार पुढे देवरुख ला जात असलेल्या एसटी बसवर आदळली. या अपघातात डॉ. शेट्टी यांच्या कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व्हिस रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

 

अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे हवालदार राजेंद्र नानचे यांनी अपघातस्थळी जात अपघाताची पाहणी केली. दरम्यान अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतुल कोंडी झाली होती. हवालदार नानचे यांनी त्या ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.