भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ‘सुवर्ण ‘ यश ; गणित ऑलिंपियाडमध्ये २० विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल
_यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित ऑलिंपियाड फाउंडेशनने घेतलेल्या नॅशनल गणित ऑलिंपियाड परीक्षेत लक्षणीय यश संपादन केले आहे. परीक्षेला शाळेचे ९६ विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष बाब म्हणजे यापैकी २० विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
_सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक आणि मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या._