बांदा (प्रतिनिधी)
बांदा येथे रंगपंचमीचा उत्साहात संपन्न
होळी पौर्णिमेपासून पंधरा दिवसांनी बांद्याचा रंगपंचमी उत्सव साजरा होतो. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून दिवसभर बांदयात सर्वत्र रंगाची उधळण सुरू होती. बुधवारी सायंकाळी पारंपारिक “सुवारीचा रोंबाट ” ही फेरी झाली. रात्री स्थानिक कलाकारांचा “एकदा पहावं करून” हा नाट्य प्रयोग झाला .गुरुवारी सकाळी बांदा बाजारपेठेतील श्री देव मांडकरी देवस्थान येथे पारंपारिक धार्मिक विधी झाल्यानंतर शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत रंगांची उधळण झाली व रंगपंचमीला आरंभ झाला. त्यानंतर दिवसभर संपूर्ण गावात जागोजागी रंगांची उधळण सुरू होती.





