उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये – नितेश राणे 

13

 

कणकवली (प्रतिनिधी)

उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये – नितेश राणे 

हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्यावर सातत्याने टीका करत आहेत. पण भगव्याचा द्वेष करणाऱ्या आणि हिरव्याचं लांगुलचालन करणाऱ्या ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राज्यात, देशात हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सगळे एकाच धर्माचे कसे? आणि त्याविरोधात आम्ही आवाज उठवला तर आम्ही चुकीचे कसे ठरु शकतो असा सवाल पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला.

 

कणकवलीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , संदीप साटम आदी उपस्थित होते.राणे म्हणाले की, भाजप पक्षाच्या झेंड्यातील हिरवा रंग देखील ठाकरेंना खुपतोय. तो काढावा अशी ते मागणी करताहेत. पण आमचा झेंडा कसा दिसावा याची चिंता त्यांनी करू नये. कारण आता भगवा आणि ठाकरे यांचा काहीही संबंध राहिलेला नाही.

 

ते म्हणाले, मुख्यमंत्री होवून देखील ठाकरेंना संवैधानिक प्रक्रियांची माहिती नाही. विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवल्यावरून ते टीका करत आहेत. वस्तुतः जो कायदा देशाला तोच राज्याला लागू होतो. संसदेमध्ये विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने संसदेत ि पक्ष नेता नव्हता. तशीच स्थिती राज्यात आहे. पण ठाकरेंना कायद्याचा कोणताही अभ्यास नाही.

 

देशात, राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व हिंसाचारा मधील आरोपी हे एकाच धर्माचे आहेत. त्यामुळेच आम्ही त्या विरोधात आवाज उठवत आहोत. आम्हाला हिंदूत्व शिकवणाऱ्यांनी कधी त्या धर्मातील उन्मादींना संविधान शिकवलं आहे का? त्यांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय का? हे आधी तपासून पहावं असे राणे म्हणाले.

 

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री अजितदादा यांनी यंदाचा प्रभावी अर्थसंकल्प मांला आहे. आमचं राज्य प्रगतशील राज्य म्हणून अधिक भक्कमपणे पुढे जाणार आहे. राज्य हिताचे जे मुद्दे, विधेयक मांडण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. या उलट विरोधी पक्षांत ताळमेळ राहिलेला नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून विरोधक अपयशी ठरले आहे. जनतेने आम्हाला जनमताचा मोठा कौल दिलाय. त्यामुळे आगामी पाच वर्षात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर दिसेल.

 

जिल्हा परिषदेचा निधी खर्च करण्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी थोडा कंटाळा दाखवला. योग्य नियोजन केलं नाही. पण त्यांना आम्ही समज दिली गेली, त्यांना शासन केलं गेलं. ज्या गोष्टी चौकटीत बसत नव्हत्या. त्यामध्ये आम्ही सुधारणा करून निधी योग्य पद्धतीने खर्च केला. जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी योग्य नियोजन आम्ही केलंय असेही श्री. राणे म्हणाले.