गावाच्या सेवेत समर्पित व्यक्तिमत्व  श्री रामदास तेजम वाढदिवस विशेष..

34

 

 

सिंधुदुर्ग 

गावाच्या सेवेत समर्पित व्यक्तिमत्व  श्री रामदास तेजम वाढदिवस विशेष..

११ मार्च २०२५

 

देवगड तालुक्यातील निसर्गरम्य आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कुणकेश्वर गावात ११ मार्च १९७८ रोजी जन्मलेले श्री रामदास विजय तेजम हे गावाच्या सेवेसाठी समर्पित झालेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले रामदास तेजम यांनी आपले प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर इतर तरुणांप्रमाणे मोठ्या शहरात स्थायिक होण्याचा मार्ग स्वीकारला नाही. त्याऐवजी, त्यांनी आपल्या गावाची सेवा करण्याचा निर्धार केला आणि गावाच्या धार्मिक व सामाजिक कार्यात योगदान देण्याचा मार्ग स्वीकारला.

 

 

 

कुणकेश्वर कातवणेश्वर गावच्या गावकऱ्यांच्या विश्वासाने आणि त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे रामदास तेजम यांना श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर या प्रतिष्ठित संस्थेच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. कुणकेश्वर मंदिर हे केवळ देवगड तालुक्यातीलच नव्हे, तर संपूर्ण कोकणातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

 

रामदास तेजम यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि दूरदृष्टीने देवस्थान व्यवस्थापन, उत्सवांचे आयोजन आणि प्रशासकीय कामकाजाचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. त्यांच्या कुशल व्यवस्थापनामुळे मंदिरातील सर्व धार्मिक उत्सव, यात्रा, महाशिवरात्रीचा सोहळा दीपोत्सव तसेच इतर धार्मिक विधी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतात. आयुष्यात आलेल्या अडचणी आणि संघर्षांवर मात करत रामदास तेजम यांनी कधीही हार मानली नाही. श्री देव कुणकेश्वर महादेवाच्या कृपेने आणि गावकऱ्यांच्या पाठबळामुळे त्यांनी आपल्या कार्यात सातत्य टिकवले. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून, विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांचेशी मिळून मिसळून आणि समन्वय्याने सर्व गोष्टी हाताळून त्यांनी मंदिराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, मंदिराचा सांस्कृतिक वारसा जपला आणि भाविकांसाठी सुविधा वाढवण्यावर भर दिला.

 

 

आजच्या युगात तरुण वर्ग मोठ्या शहरांकडे वळत असताना, रामदास तेजम यांनी आपल्या गावातच राहून सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या समर्पणाने आणि मेहनतीने ते आज गावाच्या विकासासाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनले आहेत.

 

 

गावाच्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक श्री रामदास विजय तेजम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शंभू महादेवाच्या कृपेने त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिक यश मिळो, हीच कुणकेश्वर चरणी प्रार्थना !

 

 

– संपूर्ण गावकऱ्यांच्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा !
जय कुणकेश्वर…… श्री रामेश्वर