मुंबई : “निर्लज्जम सदा सुखी, अशा पद्धतीने भाजपाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रात उतरले होते. मविआने त्यांच्याविरोधात आंदोलन केल्यानंतर सरकारला सुचलेले हे उशीराचे शहाणपण आहे. कारण आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणादरम्यान गदारोळ होणार होता, तसेच कोल्हापूरमधील दीक्षांत सोहळ्याला राज्यपालांना येऊ दिले जाणार नव्हते. कोल्हापूरवासीयांनी त्याविरोधात आंदोलन देखील केले. म्हणूनच महापुरुषांचा अपमान करणाऱ्या एका बेशरम माणसाला पदमूक्त केल्याबद्दल आम्हाला आनंद वाटत आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.





