बांदा (प्रतिनीधी)
बांदा येथे प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या स्वर्णिम भारत रथाचे स्वागत
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान यांच्या स्मर्णिम भारत यात्रेचे बांदा येथे स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्ग आणि गोवा असा दौरा करत असलेल्या या रथयात्रेचा 3 फेब्रुवारी रोजी दोडामार्ग तालुक्यातून आरंभ झाला.रविवारी बांदा येथील श्री विठ्ठल मंदिर च्या व्यापारी भुवन सभागृहामध्ये या अध्यात्मिक चित्ररथ यात्रेचे आगमन झाले.
अध्यात्मिक विकासासाठी राजयोगाचे प्रशिक्षण तसेच महाशिवरात्रीचे रहस्य व अन्य माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी व्यापारी भुवन येथे ब्रम्हाकुमारी संस्थेतर्फे बारा फुटी शिवलिंग तसेच बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींची मांडणी करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांना प्रत्येक ज्योतिर्लिंगाची माहिती दिली जात आहे तसेच राजयोग लेझर शो द्वारे राज्यविका बद्दल मार्गदर्शन केले जाते जात आहे . हे प्रदर्शन रविवार दिनांक 9 आणि सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी असे दोन दिवस चालणार आहे .या माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर ,श्री बांदेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत ,श्री विठ्ठल मंदिर सेवेकरी आशुतोष भांगले, लक्ष्मी सावंत, प्रजापिता ब्रह्माकुमारी च्या गोवा तथा सिंधुदुर्ग प्रमुख शोभादीदी , सावंतवाडी सेवा केंद्राच्या कांचनदीदी, कुडाळ सेवा केंद्राच्या हर्षाबहन यांच्या हस्ते झाले.





