आज दि . १२ फेब्रुवारीला ७३ केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा…!

157

दोडामार्ग : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी रविवार दि. १२ फेब्रुवारीला जिल्ह्यातील इ.५ वी साठी ४४ केंद्र व इ.८ वी साठी २९ केंद्र असे एकुण ७३ केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे.

अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.इयत्ता ५ वी साठी ३ हजार ७९९ विद्यार्थी व इयत्ता ८ वी साठी २ हजार १९२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.