कुडाळ (प्रतिनीधी)
एसटी तिकीट दरवाढी विरोधात कुडाळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक
कुडाळ बसस्थानकात छेडले चक्काजाम आंदोलन
एसटीच्या तिकिटात दरवाढ करून महायुती सरकारकडून जनतेची लूट – वैभव नाईक
दरवाढ रोखण्यासाठी आम्ही यापुढेही लढा देणार,जनतेने लढयात सहभागी व्हावे- संजय पडते
एसटी तिकीट दरवाढी विरोधात कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ बसस्थानकात चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. यावेळी दरवाढीच्या निषेधाचे फलक झळकविण्यात आले. एसटी तिकीट दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो! गोरगरीब जनतेची लूट करणाऱ्या सरकारचा निषेध असो! महायुती सरकारचा निषेध असो! अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. तसेच झालेली दरवाढ सामान्य जनतेच्या निदर्शनास आणून देण्यात आली.





