कणकवली सिद्धार्थनगर येथे अंगणवाडीचे समीर नलावडे यांच्या हस्ते उद्धाटन…!

कणकवली : कणकवली सिद्धार्थनगर येथे नगरपंचायत कणकवली यांच्या मार्फत बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वाडीतील रहिवाशी सुनील हिंदळेकर व सिकंदर जाधव यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे स्वागत केले. सौ. प्रतीक्षा कांबळे यांनी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे स्वागत केले. अंगणवाडी सेविका सुर्वे यांचे स्वागत देखील करण्यात आले.

अंगणवाडीचे सर्व विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. माजी नगरसेवक गौतम खुडकर, आनंद जाधव, विश्वास कांबळे, महेंद्र जाधव, संदीप कांबळे, सतीश कांबळे, माजी नगरसेविका सौ.विशाखा कांबळे, नगरसेविका सौ.उर्मी जाधव व अंगणवाडीसाठी ज्यांनी जमीन दिली ते जमीन मालक सिकंदर जाधव व त्यांच्या मातोश्री या देखील उपस्थित होते.