सावंतवाडी (प्रतिनीधी)
प्रेरणा संमेलनात लिहित्या विद्यार्थ्यांचा सन्मान
सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने दळवी ज्या शाळेत शिकले,त्या जीवन शिक्षण शाळेत आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याने आयोजित केलेल्या ‘सारे प्रवासी घडीचे’ या पुस्तकावरील चर्चेवरील वृत्तांत लेखन स्पर्धेत नेहल अक्षय मळगावकर याने प्रथम, तर असिफा अनिष शेख व मनस्वी प्रवीण दळवी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.







