वेंगुर्ला (प्रतिनिधी)
एसटी बस चालकाची दादागिरी ; चालकावर कारवाई करण्याची मनोहर चव्हाण यांची मागणी
गुरुवारी सकाळी 19/12/2024 रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ कवठी परुळे मार्गांवर एस. टी. बस क्र. MH 20 BL 2916 या बस चे चालक बॅच क्र. 44573 हे गाडी वालावलं स्टॉप जवळ आली असता एक वृद्ध आजोबा वय 65 यांनी दम लागला असतानाही धावत बस चा जवळ येऊन हात दाखवला तरीही बस चालक चव्हाण यांनी बस थांबावली नाही.
म्हणून बस मधील प्रवासी मनोहर चव्हाण यांनी चालकाला गाडी थांबवण्याची विनंती केली व तुमचे आई वडील असतील तर तुम्ही असेच करणार का असे विचारलं म्हणून चालक याने गाडी बंद करून प्रवासी चव्हाण यांच्या अंगावर धावून गेले व आवर्च भाषेत दम दिला.
याची तक्रार कुडाळ बस डेपो येथे मनोहर विठ्ठल चव्हाण. रा. चिपी यांनी दिली. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चालकावर कडक कार्यवाही ची मागणी केली जात आहे.





