सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर तर सचिवपदी दिलीप (बाळ) खडपकर यांची निवड
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड अध्यक्ष पदी उमेश तोरसकर तर सचिवपदी दिलीप उर्फ बाळ खडपकर यांची निवड करण्यात आली.तर परिषद प्रतिनिधी म्हणून गेणेश जेठे यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात संपन्न झाली.या सभेत नूतन जिल्हा कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली.या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य गणेश जेठे यांनी काम पाहिले.त्यांच्या नीटनेटक्या नियोजनामुळे ही निवडणुक बिनविरोध झाली.
यात नवनियुक्त कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष उमेश तोरसकर,सचिव दिलीप उर्फ बाळ खडपकर,उपाध्यक्ष आनंद लोके,बंटी उर्फ विद्याधर केनवडेकर,संतोष राऊळ ,किशोर जैतापकर,खजिनदार संतोष सावंत,महेश सरनाईक (एक एक वर्ष विभागून )सहसचिव प्रवीण मांजरेकर, म्हणून तर कार्यकारणी सदस्यपदी राजन नाईक कुडाळ,लवू म्हाडेश्वर सिंधुदुर्गनगरी, लक्ष्मीकांत भावे कणकवली,अमित खोत मालवण,प्रशांत वाडेकर देवगड,महेंद्र मातोंडकर वेंगुर्ला,सुहास देसाई दोडामार्ग.आणि निमंत्रित सदस्य देवयानी वरसकर सिंधुदुर्गनगरी.आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभेच्या सुरुवातीला पत्रकार तसेच पत्रकारांच्या दिवंगत नातेवाइकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तर समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.या सभेत वार्षिक जमा खर्च तसेच इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली.