कणकवली : आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पडवे सिंधुदुर्ग यांच्यावतीने छत्रपती शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय भव्य निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सदर स्पर्धांचे आयोजन होत आहे.
निबंध स्पर्धा :
गट ३ रा : महाविद्यालयीन व खुला गट
विषय :
१) भारत महासत्तेच्या दिशेने
२) G-20 आणि भारत
३) पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची सुशासनाची ८ वर्ष
४) MSME विभाग व्याप्ती आणि विस्तार
५) चला उद्योजक बनुया
६) छत्रपती शिवराय वैशिष्ट्य आणि विचार
७) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या पुढील दिशा
बक्षिसे :
प्रथम क्रमांक : २५,०००
द्वितीय क्रमांक : १५०००
तृतीय क्रमांक : १००००
उत्तेजनार्थ ५००० व प्रमाणपत्र
शब्द मर्यादा : १००० शब्दस्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
सर्व निबंध हे लिखित व मुद्रित अशा २ प्रतीत दि. १५ फेब्रुवारी, २०२३ सायं. ५ वाजेपर्यंत खालील पत्त्यावर पोचावेत.
१) श्री. संजू परब यांचे कार्यालय, रामेश्वर प्लाझा,सारस्वत बँकशेजारी, मोती तलावासमोर सावंतवाडी. मोबा. नं. ९४२२६३१८०८/९४२०९२४८४२
२) श्री. निलेश कडावलकर, बजाज फ्युचरिस्टीक शोरूम, मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ मोबा. नं. ९४२२४३४२४२
३) श्री. विवेक सावंत, मा. नामदार श्री. नारायण राणे साहेब संपर्क कार्यालय एस.टी.स्टँडसमोर कणकवली. मोबा. नं. ९७६४५४०७३७
याठिकाणी सकाळी ११ ते सायं. ६ यावेळेत प्रत्यक्ष जमा करावेत किंवा पोस्टाने पाठवावेत. अंतिम तारीख १५ फेब्रुवारी, २०२३ या स्पर्धेचे बक्षिस वितरण दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात येईल. बक्षिस वितरण कणकवली येथे होईल.
संपर्क : डॉ. मिलिंद कुलकर्णी
मोबा. ९४२२१५४७८५
श्री. सुरेंद्र ऊर्फ अण्णा कोदे
मोबा. ९४२२३८१९००
श्री. मिलिंद मेस्त्री
मोबा. ९४२०६५४५६५ कृपया प्रत्येकाने आपल्या निबंधावर आपले पूर्ण नाव, गट, पत्ता व संपर्क क्रमांक यांचा उल्लेख करावा.
चित्रकला स्पर्धा गट ३ रा : खुला गट
विषय : १) आरमार व शिवराय
२) शिवराय व स्वामीनिष्ठ मावळे यांच्यावर आधारित कोणतेही प्रसंगचित्र
३) माझ्या स्वप्नातील सिंधुदुर्गातील सी वर्ल्ड
४) आत्मनिर्भर भारत
बक्षिसे प्रथम क्रमांक : २५,०००
द्वितीय क्रमांक : २०,०००
तृतीय क्रमांक : १५,०००
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
सदर चित्रकला स्पर्धा शनिवार दि.१८ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत प्रत्येक तालुक्यामध्ये नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी किंवा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणी दि. १५ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत नेमून दिलेल्या तालुका केंद्रप्रमुख यांच्याकडे करावी. स्पर्धेला लागणारा पेपर आयोजकां मार्फत पुरविला जाईल.
खुल्या गटाच्या स्पर्धा नियोजन वैभववाडी, देवगड व कणकवली या तालुक्यातील खुल्या गटाच्या स्पर्धकांनी कणकवली विद्यामंदिर हायस्कूल येथे स्पर्धेसाठी उपस्थित रहावे. कुडाळ, वेंगुर्ला व मालवण या तालुक्यातील खुल्या गटाच्या स्पर्धकांनी मालवण टोपीवाला हायस्कूल येथे स्पर्धेसाठी उपस्थित रहावे.
दोडामार्ग व सावंतवाडी या तालुक्यातील खुल्या गटाच्या स्पर्धकांनी मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव येथे स्पर्धेसाठी उपस्थित रहावे.
नावनोंदणीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर नावनोंदणी दि. १५ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत करावी.
कणकवली तालुका, प्रसाद राणे मोबा. नं. ९४२२३७४१२७
स्पर्धा ठिकाण : विद्यामंदिर हायस्कूल कणकवली
सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी सायं. ७ वाजता कणकवली येथे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होईल.





