देव काशीकलेश्वराच्या जय घोषात झाला मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहण…!

कणकवली : तालुक्यातील कलमठ गावचे ग्रामदैवत श्री देव काशीकलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण, आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा हर हर महादेव च्या जयघोष असंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी करवीर पिठाधीश शंकराचार्य महाराज यांच्या हस्ते मंदिर कलशाची स्थापना करण्यात आली.श्रद्धेने ओतप्रोत भरलेल्या धार्मिक वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. ओम नमः शिवाय चा अखंड नामस्मरणाने या सोहळ्यात नवे चैतन्य निर्माण केले. कलमठ गावचे सर्व मानकरी ग्रामस्थ विविध क्षेत्रातील भक्त भाविक यांच्या अभूतपूर्व उत्साहाने हा सोहळा आणखीनच दिमाखदार बनला. ब्राह्मण्य मंत्रघोषात धार्मिक विधी करून मंदिर आणि मूर्तीमध्ये दैवत्वप्रतिष्ठापना करण्यात आली. तर सांस्कृतिक कार्यक्रमांनी ही जनतेच्या मनातील भक्ती भाव आणखीनच वृद्धिंगत केला.

७ फेब्रुवारीपासून गेले चार दिवस श्री देव कलेश्वर मंदिर जिर्णोद्धार कलशारोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सुरू आहे. या सोहळ्यासाठी गावातील आणि परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित झाला. दर्शनासाठी,महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने रांगा लावून भक्ताने लाभ घेतला.पहिल्या दिवसापासूनच हा सोहळा उत्साह आणि चैतन्यने भरलेला होता.

आज कालशरोहन सोहळ्याला करवीर पिठाचे शंकराचार्य यांचे आगमन झाले त्यांची संवाद मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर त्यांच्या हस्ते कलशाचे पूजन करण्यात आले व हे पूजन केलेले कलश मंदिरावर प्रतिष्ठापित करण्यात आले. त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या देवदेवतांच्या मूर्त्यांमध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर महापूजा बलिदान पूजा आरती प्रार्थना आशीर्वचन व महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम झाले सायंकाळी भजने कीर्तने, शास्त्रीय गायन असे विविध कार्यक्रम संपन्न झालेत.