ग्रामीण शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वात्सल्य ट्रस्टकडून गणवेश वाटप…!

देवगड : छत्रपती शिक्षण संस्थेच्या जयजवान जय किसान वाघरी, वारंगी. रायगड येथील माध्यमिक शाळेतील अत्यंत गरजू 25 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. कोकण कट्टाग्रुप विलेपार्लेचे संस्थापक अजित पितळे व जय मल्हार धनगर सामाजिक संस्थेचे बाळाराम कुपेकर यांच्या विशेष मार्गदर्शनाने मुंबईतील नामवंत सेवाभावी संस्था वात्सल्य ट्रस्टच्या आर्थिक सहकार्याने हे गणवेश वाटप करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक देवरुखकरसर, गरधेसर, काळगूडेसर व जय मल्हार धनगर सामाजिक संस्थेचे सुनिल ढेबे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. प्राध्यापक व उपस्थित शिक्षक वर्गानी वात्सल्य संस्थेच्या पदाधिकाऱ्याचे मनस्वी आभार व्यक्त केले. कोकण कट्टाचे अजित पितळे व बाळाराम कुपेकर यांच्या योग्य मार्गदर्शनानेच हा कार्यक्रम होऊ शकला असे गौरवोद्गार काढून उपस्थितांनी धन्यवाद दिले.