आंदोलनकर्त्यांचा संयम सुटण्याची वेळ | प्रांताधिकारी खातायत एसीची हवा
कणकवली : कणकवली हळवल फाटा येथे सुरू असलेल आंदोलन चिघळण्याची शक्यता..? आंदोलन ठिकाणी दंगल नियंत्रन पथक आंदोलन स्थळी दाखल दाखल झाले आहेत. मात्र प्रांताधिकारी जोपर्यंत आंदोलन ठिकाणी येऊन किंवा प्रशासन संबंधित अधिकारी याठिकाणी येऊन याठिकाणी झालेल्या सदोष कामाचे तसेच झालेल्या अपघातांना दोषी ठरवणे व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारच्या हालचाली संबंधित प्रशासनाकडून झालेल्या नाहीत.

मात्र पोलीस प्रशासनाचा वापर करून याठिकाणी तीव्र वळण देण्याचा प्रयत्न मात्र कायम दिसत आहे. हा प्रकार अजून किती दिवस चालणार ? असा प्रश्न आंदोलन स्थळी आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र प्रांताधिकार्यांकडून आलेल्या निरोपानुसार आपण पंधरा मिनिटात आंदोलन ठिकाणी पोहोचत असल्याची माहिती आली होती. मात्र अद्यापही प्रांताधिकारी पंधरा मिनिटे उलटून गेल्यावरही त्या ठिकाणी आलेले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त वाढवलेला आहे.एकंदरीत वस्तुस्थिती पाहता या ठिकाणी आंदोलनकर्त्यांचा कुठे तरी पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून जो संताप आहे तो वाढवण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे. मात्र कितीही परिस्थिती वाढली तरी आपण या आंदोलनावर ठाम असल्याचे देखील आंदोलनकर्त्यांकडून सांगितले जात आहे.





