१२ फेब्रुवारीला “इन्स्पायर सिंधुदुर्ग 2023” सायकल मॅरेथॉन | आत्तापर्यंत ४०० सायकलपटूंचे रजिस्ट्रेशन

कुडाळ : इन्स्पायर सिंधुदुर्ग 2023 सायकल मॅरेथॉनला रत्नागिरी, पुणे, मुंबई, कोल्हापूर, गोवा, सिंधुदुर्ग मधून 400 सायकलपटूंनी सहभाग घेतला असून सिंधुदुर्ग जि. प. चे मुख्याधिकारी प्रजित नायर, उपपोलिस अधिक्षक सिंधुदुर्ग बगाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी काळे आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे. 25, 50, 100 किमी. मध्ये हि सायकल मॅरेथॉन होणार आहे.

सिंधुदुर्ग सायकल असोसिएशनच्या माध्यमातून व कुडाळ सायकल क्लब यांच्या नियोजनातून इन्स्पायर सिंधुदुर्ग 2023 दिनांक 12 फेब्रुवारी 2023 होत असलेल्या सायकल मॅरेथॉन मध्ये आजपर्यंत जवळजवळ 400 सायकलपटूंनी रजिस्ट्रेशन केले असून सुमारे 500 सायकलिस्ट या इव्हेंटमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या पटांगणावरून या सायकल मॅरेथॉनला सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम शंभर किलोमीटर अंतर पार करणारे सायकल स्वार यांना मार्गस्थ केले जाणार. व त्यानंतर पन्नास किलोमीटरवर 25 किलोमीटर मधील सहभागी सायकलिस्टना मार्गस्थ केले जाणार आहे.

या सायकल मॅरेथॉनचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर तसेच उप पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग बगाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी काळे आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर यांच्या उपस्थितीत होणार असून त्यांचा सहभाग देखील असणार आहे.

25 किलोमीटर वेंगुर्ला मठ पर्यंत व परत, पन्नास किलोमीटर वेंगुर्ला बंदर व परत, शंभर किलोमीटर वेंगुर्ला, पाट, परुळे मार्गे मालवण व कट्टा धामापूर मार्गे परत. या मार्गावर ठराविक अंतरावर हायड्रेशन पॉईंट ठेवण्यात आलेले आहेत.
तसेच सुसज्ज तीन ॲम्बुलन्स व फिरती पथके देखील असणार आहेत.