बांदा (मंगल कामत)
अपर प्रधान सचिवाकडून इन्सुली नाक्याचा आढावा
राज्य उत्पादन शुल्क खात्याचे महाराष्ट्र राज्याचे अपरप्रधान मिलिंद म्हैसकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचोली सीमा तपासणी नाक्याला भेट देत आढावा घेतला
निवडणुकीच्या कालावधीतगोव्यातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक होण्याची शक्यता असल्यामुळे नाक्यावरील अधिकारी व कर्मचारी यांना विशेष दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या यावेळी राज्य उत्पादन शुल्क खात्याचे सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक मनोज शेवरे यांच्यासह खात्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते म्हैसकर यांनी नाक्याची तपासणी करत करत कारवाई संबंधी माहिती घेतली. निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहितेच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचारी यांना विशेष सूचना करून फिरतीग्रस्त पथके तैनात ठेवण्याचेही त्याने अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले





