सावंतवाडी (प्रतिनिधी)
बाळासाहेबांनी स्थापन केलेली महायुती पुन्हा एकत्रित आणण्याचं काम एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केल – दीपक केसरकर
बाळासाहेबांनी स्थापन केलेली महायुती पुन्हा एकत्रित आणण्याचं काम एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केल. या दोघांची जोडी राज्यात विधायक काम करत आहेत. अनेक विकासकामे युती सरकारने केली. ते पाहून अजित पवार देखील सरकारमध्ये सहभागी झाले. लोकहिताच काम करणार सरकार राज्यात पुन्हा आणण्यासाठी महायुतीचे उमेदवारांना विजयी करा असे आवाहन दीपक केसरकर यांनी केलं. तर नारायण राणे, रविंद्र चव्हाण यांची साथ असल्याने आपण विजयाचा चौकार मारणारा असल्याचा विश्वास मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला. तळवडे येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.





