गोकुळ संघ जिल्ह्यात आल्यामुळे दूध संस्थांना मिळाली नवी संजीवनी 

11

 

बांदा (मंगल कामत)

गोकुळ संघ जिल्ह्यात आल्यामुळे दूध संस्थांना मिळाली नवी संजीवनी 

बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्था मर्यादित बांदा.या संस्थेची स्थापना 13 जानेवारी 1984 साली झाली. आज संस्थेची स्वत:च्या मालकीची इमारत आहे. संस्थेत एकूण 401 सभासद आहेत . संस्थेला 40 वर्षे पूर्ण झाली. शासनाने दूध घेणे बंद केल्यानंतर संस्थेने अनेक चढ-उतार पाहिले . विक्री करून राहिलेल्या दुधाची संस्थेसमोर मोठी समस्या होती. राहिलेल्या दुधाचे वितरण कारणे फार कठीण होते. त्यातून मार्ग काढून दूध उत्पादकाला योग्य दर देणे हे त्याही पेक्षा कठीण होते. शासनाने दूध घेणे बंद केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक संस्था बंद पडल्या. पण संस्थेने नियोजन बद्दल रित्या दूध उत्पादकांना हाताशी धरून संस्था चालू ठेवली. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास हा देखील महत्त्वाचा आहे. गेले काही वर्षे संस्था गोकुळ संघास दूध पुरवठा करते. गोकुळ संघ जिल्ह्यात आल्यामुळे दूध संस्थांना नवीन संजीवनी मिळाली. काही बंद पडलेल्या संस्था सुद्धा पुन्हा सुरू झाल्या. बांदा उसदूध संस्थे समोर सुद्धा विक्री करून उरलेल्या दुधाची समस्या होती . गोकुळ संघ आल्यामुळे त्या समस्येवर तोडगा निघाला . संस्थेचे चेअरमन माननीय श्री. नारायण शिवराम गायतोंडे व त्यांचे संचालक मंडळ सन 2018 पासून उत्तम रित्या कामकाज पहात आहे .

त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव दीपक महादेव चव्हाण हे देखील संस्थेत गेली 21 वर्षे काम पाहत आहेत.सध्या संस्थेचे दूध संकलन 650 ते 700 लिटरच्या आसपास आहे. ते 1000 लिटरच्या वर घेऊन जाण्याचा संस्थेचा संकल्प आहे. संस्था दूध उत्पादक सभासदांना ₹ 5,000 ते 50,000 पर्यंत केवळ दोन दूध उत्पादक जामीन घेऊन कर्ज पुरवठा करते . कर्ज प्रक्रिया सुलभ असल्यामुळे दूध उत्पादकाला एका दिवसात कर्ज मिळते. या संस्थेने सालाबाद प्रमाणे दूध उत्पादकांना 7% शेकडा प्रमाणे तब्बल ₹6,33,383/- एवढा बोनस वितरित केला त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे दूध पुरवठादार शेतकरी श्री समीर श्रीकांत पेळपकर यांना ₹35,763/-, द्वितीय क्रमांकाचे दूध पुरवठादार शेतकरी श्री जयदीपक काशीराम गवस यांना ₹35,274/- तसेच तृतीय क्रमांकाचे दूध पुरवठादार शेतकरी श्री रुपेश अर्जुन माजगावकर यांना ₹29,607/- एवढा बोनस प्राप्त झाला याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचा बोनस त्यांच्या सिंधुदुर्ग बँकेतील सेविंग खात्यावरती जमा करण्यात आला तसेच दूध उत्पादक सभासद डिव्हीडंड 10% प्रमाणे ₹40,787/- एवढा वितरित करण्यात आला.त्याचप्रमाणे दिवाळी भेट म्हणून शेतकऱ्यांना साबनाचे वाटप करण्यात आले. तसेच संस्थेचे सचिव व संकलक यांना एक एक पगार बोनस देण्यात आला.

गेल्या सात-आठ वर्षापासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना संस्था चांगला बोनस देत आहे सन 2018-19 ₹ 3,34,118/- सन 2019-20 ₹ 3,55,789/- सन 2020-21 ₹ 4,88,794/- सन 2021-22 ₹ 6,78,281/- सन 2022-23 ₹ 9,60,688/- अशाप्रकारे संस्थेने आतापर्यंत दूध उत्पादकांना चांगला बोनस वितरित केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात रुपये एक कोटीच्या वर दूध संकलन झाले. चालू वर्षांमध्ये ते आणखी वाढवण्याचा संस्थेचा संकल्प आहे. त्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे . असे मनोगत संस्थेचे चेअरमन माननीय श्री नारायण शिवराम गायतोंडे यांनी व्यक्त केले. त्यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री राजेश तुकाराम पावसकर , सदस्य श्री समीर श्रीकांत पेळपकर , श्री प्रमोद यशवंत देसाई ,श्री बापू साबाजी आईर , सौ यशोदा झिलू सावंत तसेच संस्थेचे सचिव दीपक महादेव चव्हाण हे उपस्थित होते.