६० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक वायर चोरल्याप्रकरणी २ परप्रांतीयांना अटक…!

बांदा : घरासमोर ठेवलेली ६० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक वायरची दोन बंडले चोरून नेल्याप्रकारणी बांदा पोलिसांनी दोघा परप्रांतीय कामगारांना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. याप्रकरणी ठेकेदार सुनील राऊळ यांनी ५ फेब्रुवारीला बांदा पोलिसात तक्रार दिली होती.

धीरा लक्ष्मण नाईक-चव्हाण (वय ४५) व संतोष फोमा नाईक- चव्हाण (वय ३४, दोघे रा. मेरशी-गोवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारीनुसार बांदा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर भोसले अधिक तपास करत होते. दोन्ही संशयिताना गोवा येथून ताब्यात घेण्यात आले.