कोलगाव येथे जिल्हास्तरीय खुल्या बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन…!

सावंतवाडी : श्री ईस्वटी कला क्रीडा मंडळ, कोलगाव, भोमवाडी आणि मुक्ताई ॲकेडमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोलगाव येथे जिल्हास्तरीय खुल्या बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा रविवार दि.12 फेब्रुवारी रोजी कोलगाव तिठ्याजवळील वेंगुर्ले – बेळगाव रोडवरील कोलगाव माध्यमिक विदयालय येथे घेण्यात येईल. दहा व पंधरा वर्षे वयोगटातील मुला – मुलींचे चार गट आणि खुला गट अशा पाच गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उदघाटन कोलगाव ग्रामपंचायत सरपंच संतोष राऊळ यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता करण्यात येईल. राष्ट्रीय बुदधिबळ संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा खेळविण्यात येईल. स्पर्धा बाद फेरीत न खेळविता लीग पदधतीने घेण्यात येईल. आयोजकांचा निर्णय सर्वांसाठी अंतिम आणि बंधनकारक राहील. स्पर्धकाने स्पर्धेसाठी येताना सोबत आधारकार्ड आणणे आवश्यक आहे.

खुल्या गटात पाच आणि दहा व पंधरा वर्षे वयोगटातील मुला – मुलींच्या चार गटात तीन – तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे प्रथमच दिव्यांग स्पर्धकासाठी पारितोषिक ठेवण्यात आले आहे. स्पर्धकांनी आपली नावे कौस्तुभ पेडणेकर मो. 8007382783 यांच्याशी शुक्रवार 10 फेब्रुवारी पर्यंत संपर्क साधून नोंदवावीत.