भारताच्या मदत विमानांना पाकिस्तानने हवाई मार्ग नाकारला …
तुर्कस्तान – सिरियाला इराण मार्गे पोहोचली भारताची मदत…
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरिया देशात मोठी हानी झाली आहे .सुमारे 20 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे . अशा भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या तुर्कस्तान आणि सीरियाच्या मदतीसाठी जगभरातून मदत पाठवली जात आहे. भारताने भूकंप मदत सामग्रीची पहिली खेप पाठवली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एक विशेषज्ञ शोध आणि बचाव पथक मदत या खेपेत सामील आहे. यात महिला आणि पुरुष कर्मचारी, अत्यंत कुशल श्वान पथके, वैद्यकीय साहित्य, प्रगत ड्रिलिंग उपकरणे पाठवली आहेत.


पण ज्याला आपला दोस्त समजतो त्या पाकिस्तानने भारतातून मदत सामग्री घेऊन येणाऱ्या विमानांना आपली हवाई हद्द वापरू दिली नाही, त्यामुळे भारतीय विमानांना तुर्कस्तानला जाण्यासाठी इराण मार्गे लांबचा प्रवास करावा लागला. पाकिस्तान स्वत:ला तुर्कस्तानचा सर्वात जवळचा मित्र म्हणवतो पण संकटाच्या वेळीही त्याने असे कृत्य केले. त्याचवेळी भारताने मात्र “ऑपरेशन दोस्त” अंतर्गत तातडीने तुर्कस्तान आणि सिरियाला आपत्कालीन मदत पाठवली आहे.
दरम्यान भारताकडून पाठवलेल्या मदत सामग्रीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतातील तुर्कीचे राजदूत फिरात सुनेल यांनी भारताला ‘मित्र’ म्हटले आहे. फिरत सुनेल म्हणाले, गरजेच्या वेळी उपयोगी पडणारा मित्र हाच खरा मित्र असतो. 5 फेब्रुवारीला झालेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भीषण विध्वंस झाला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत सुमारे 20,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 25,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अजूनही हजारो लोक अडकल्याची भीती आहे.

मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. संकटकाळात मदत करण्यासाठी भारताने आग्रा येथील भारतीय लष्कराच्या आर्मी फील्ड हॉस्पिटलमधून 89 सदस्यीय वैद्यकीय पथक तुर्कीला पाठवले आहे. या तज्ज्ञांमध्ये ऑर्थोपेडिक सर्जिकल टीम, जनरल सर्जिकल स्पेशालिस्ट टीम, क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट टीमसह मेडिकल स्पेशालिस्ट टीमचा समावेश आहे.
आर्मी फील्ड हॉस्पिटलमधून तुर्कस्तानला जाणारी टीम तिथे 30 खाटांची वैद्यकीय सुविधा उभारणार आहे. यासाठी टीम क्ष-किरण मशिन, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन जनरेशन प्लांट, कार्डियाक मॉनिटर्स आणि संबंधित उपकरणे सज्ज आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसल्यानंतरही सीमावर्ती भागात सुमारे 100 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की या भूकंपात 20 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.





