बांदा चेकपोस्टवर बेकायदा दारूचे मोठे घबाड ; ८६ लाखांच्या दारुसह १ कोटीचा मुद्देमाल जप्तबांदा पोलिसांची कारवाई

65

 

बांदा (प्रतिनिधी) 

बांदा चेकपोस्टवर बेकायदा दारूचे मोठे घबाड ; ८६ लाखांच्या दारुसह १ कोटीचा मुद्देमाल जप्तबांदा पोलिसांची कारवाई

      गोव्यातून नालासोपारा येथे बेकायदा होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी चेकपोस्टवर कारवाई केली. या कारवाईत ८६ लाख ४० हजार रुपयांची दारू व २० लाखांचा ट्रक असा एकूण १ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतुक केल्याबद्दल शिवाजी महादेव शिंगाडे (५३) व विद्यासागर बापू ऐतवडे (४०, दोघेही रा. बेडग, मिरज, सांगली) यांच्यासह विनापरवाना दारू मुद्देमाल भरून देणाऱ्या दोघा अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सदर कारवाई बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहाय्यक पोलीस फौजदार पालकर, हवालदार धनंजय नाईक, पोलीस नाईक वाघाटे, पोलीस शिपाई कापसे, पोलीस हवालदार सिताकांत नाईक, कोळेकर यांच्या पथकाने रविवारी इन्सुली पोलीस चेकपोस्टवर केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेकपोस्टवर वाहनांची कडक तपासणी सुरू आहे.