‘
मातोश्रीवरील प्रवेशानंतर तेली यांचे सावंतवाडी स्वागत मात्र, यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांची अनुपस्थिती
सावंतवाडी (प्रतिनिधी)
माजी आमदार राजन तेली यांनी भाजपला रामराम करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवरील प्रवेशानंतर त्यांचे स्वागत सावंतवाडी शाखेत करण्यात आले. मात्र, यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांची अनुपस्थिती पहायला मिळाली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रूपेश राऊळ यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ आला.
माजी आमदार राजन तेली यांच्या स्वागत सोहळ्यात उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, नेते बाळा गावडे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. आयात उमेदवार नको अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणाऱ्यांपैकी श्री. राऊळ होते. त्यात महाविकास आघाडीकडून राजन तेली यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे समोर येत असून प्रथमच शाखेत आलेल्या तेलींच्या स्वागतास श्री. राऊळ व गावडे अनुपस्थित राहील्याने ते नाराज असल्याच बोललं जातं आहे.





