आरोपी खिडकीतून पसार ; पोलिसांनी पुन्हा इन्सुलीत पकडला

222

आरोपी खिडकीतून पसार ; पोलिसांनी पुन्हा इन्सुलीत पकडला

 

सावंतवाडी – (प्रतिनिधी) दि ३ ऑगस्ट २०२४

 

सावंतवाडी न्यायालयात हजर करून बांगलादेशी आरोपीला परत पोलीस घेवून जात असताना सदर आरोपीला लघुशंका झाल्याने त्याला स्वच्छतागृहात पाठविण्यात आले असता त्याने संधीचा फायदा उठवत खिडकीतून पसार झाला आहे.यावेळी पोलीस एकच धावपळ उडाली.अखेर या पलायन केलेल्या बांगलादेशी आरोपीला पोलिसांनी इन्सुली येथे पकडले आहे.यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.