जामसंडे हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
देवगड (प्रतिनिधी) दि.१४ जुलै २०२४
जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या मार्च २०२४ परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवार दिनांक १३ जुलै २०२४ रोजी प्रशालेत संपन्न झाला.
जामसंडे येथील मोरेश्वर जनार्दन गोगटे हायस्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष अँड अजित गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली व अरुण फडके, डॉ. भाई बांदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी १० वी १२ वी मधील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते रोख रक्कम व भेटवस्तू आदी बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी संस्था पदाधिकारी संतोष किंजवडेकर, श्रीमती .नम्रता तावडे मुख्याध्यापक. संजय गोगटे आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिशकुमार कर्ले. यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्रीम. प्रज्ञा चव्हाण यांनी व्यक्त केले.





