देवगडमध्ये मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस ; दाभोळे शिरगाव येथे घरावर कोसळले झाड; रहाटेश्वर येथील कॉजवे पाण्याखाली तर शिरगाव बाजारपेठेत वटवृक्ष उन्मळून पडल्याने देवगड नांदगाव वाहतूक बंद

23

देवगडमध्ये मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस ; दाभोळे शिरगाव येथे घरावर कोसळले झाड; रहाटेश्वर येथील कॉजवे पाण्याखाली तर शिरगाव बाजारपेठेत वटवृक्ष उन्मळून पडल्याने देवगड नांदगाव वाहतूक बंद

देवगड (प्रतिनिधी)दि ७ जुलै २०२४

देवगड तालुक्यात पावसाने रविवारी सकाळपासून धुव्वाधार सुरुवात केल्याने ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून दाभोळे शिरगाव या दोन गावांना वादळीसह पडलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. घरावर झाडे पडून तसेच शिरगाव बाजारपेठेत मोठा मोठा वटवृक्ष उन्मळून दुकानाच्या पडवीवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. वटवृक्ष कोसळल्याने देवगड नांदगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

देवगड तालुक्यामध्ये पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून रविवारी सकाळपासून वादळी वाऱ्याचे धुवाधार पाऊस पडल्याने दाभोळे शिरगाव येथील घरांची पडझड झाली होती. दाभोळे येथील रस्त्याबाबत असलेल्या मातीची छोटी दरड कोसळल्याने रस्त्यावर माती आल्याने दाभोळे पुल ते दाभोळे ग्रामपंचायत रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. तेथीलच आत्माराम कोळकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले तर शिरगाव बाजारपेठेतील प्रदीप वाडये यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ४० हजार रुपये नुकसान झाले. देवगड निपाणी मार्गावरील शिरगाव बाजारपेठ येथे मोठा वटवृक्ष मुळासहित व्यापारी पुंडलिक शेंट्ये यांच्या दुकानावर कोसळला त्यामध्ये त्यांच्या दुकानाच्या पडवीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
देवगड तालुक्यात पावसाने धुवाधार सुरुवात करून ठिकठिकाणी पावसामुळे पूरक सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी रस्ता, कॉजवे,पाण्याखाली गेल्याने रस्ता वाहतुकीस काही काळ पूर्णतः बंद झाला होता.