आजगाव धाकोरा यामध्ये मायनिंग कंपनीकडून उद्या होणाऱ्या ड्रोन सर्व्हेला ग्रामस्थांचा कडाडून विरोध,वेळ पडल्यास संघर्ष करू मागे हटणार नाही ग्रामस्थांची भूमिका
सावंतवाडी – प्रतिनिधी
आजगाव दशक्रोशी मध्ये येऊ घातलेल्या मायनिंग प्रकल्पालाजोरदार विरोध करत सोमवारी होणाऱ्या ड्रोन सर्वे ला कडाडून विरोध ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामस्थांचा विरोध असतानाही जर सर्वे सुरू केला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आजगांव मराठी शाळेच्या प्रांगणात मायनिंग विरोधी सभेचे आयोजन 7 जुलै रोजी करण्यात आले होते. या सभेला आजगांव- धाकोरा मधील जवळपास 500 ग्रामस्थांची उपस्थिती होती. स्ट्रीगर जिओ सायन्स माध्यमातून ड्रोनसर्व्हे करणार असून त्याविरोधात ग्रामस्थ एकवटले होते. आजच्या सभेचे आयोजन हे आजगांव, धाकोरा, भोमवाडा, ग्रामस्थांनी आयोजन केले होते.
आजगांव, धाकोरा, भोमवाडा, सागरतीर्थ, आरवली तळवणे, नाणोस, मळेवाड, गुळदुवे या गावचे सरपंच, उपसरपंचांची सभेला उपस्थिती.
व्यासपीठावरची उपस्थिती- यशश्री सौदागर, अॅड. भरत प्रभू, हेमंत मराठे, पोलीस पाटील- निकिता पोखरे, रूपेश धर्णे, एकनाथ नारोजी, समीर कांबळी, रामचंद्र गवस, सुशील कामटेकर, अनुराधा वाडकर, स्नेहा मुळीक
काल शनिवारी- पोलीस अधीक्षकांनी वेंगुर्ला पोलीस स्टेशनला पत्र पाठवून आजगांव,भोमवाडा, धाकोरा, आरवली यांच्या सरपंचांना वेंगुर्ला पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले. पोलिसांनी मायनिंग संबंधी प्रत्येकाचे मत विचारले. यावर सर्व सरपंचांनी गावचा विरोध असल्याचे ठाम सांगितले. यामायनिंग प्रकल्पाला विरोध करण्यासाठीआजगाव मराठी शाळेच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत खालील उपस्थित व्यक्तींनी मार्गदर्शन केले
*मळेवाड ग्रा. तर्फे हेमंत मराठे-*
मळेवाड ग्रा.ला ड्रोन सर्व्हेचे पत्र दिले नाही. राजकीय पुढाऱ्याच्या हातात नेतृत्व देऊ नका. कळणे मायनिंग वेळी पत्रकार म्हणून प्रकार बघीतला आहे. दर्दी हवेत, गर्दी नको ase मत मराठे यांनी व्यक्त केले.जय राजकीय पक्ष आपणाला पाठिंबा देतील त्याचा पाठिंबा देऊया मात्र आपल्या संघर्षाचा झेंडा राजकीय पुढाऱ्याच्या हातात देऊया नको आणि आपल्या फूट पाडव्या नको. फूट पडेल तीच मायनिंगची नांदी असेल. माझी या मातीशी नाळ. कंपनीला मायनिंग सुरू करण्यासाठी 100 एकर जागा लागते , ती मिळाल्यास मायनिंग सुरू होईल. इतर गावांचा सहभाग घ्या. एकच धोरण, एकच तोरण- मायनिंग विरोध. यावेळी त्यांनी तिंबलो मायनिंगचं संकट मळेवाड गावावर घोंघावत असल्याची खंत बोलून दाखवली.
*जयप्रकाश चमणकर- ग्रामस्थमार्फत मत व्यक्त* सर्व्हे 39 शिरोडा वेळागरतर्फे मत मांडण्यासाठी उभा आहे. पुढील सभेला वेळागरच्या 100 लोकांना घेऊन मायनिंग विरोधाला पाठींबा देतोय. जिल्हा आंबा बागायतदार संघटनेतर्फे लढ्याला पाठिंबा देतोय.
*गुळदुवे सरपंच रूपेश धर्णे*- मायनिंग नको, गुळदुवे ग्रामस्थांचा लढ्याला पूर्ण पाठिंबा.
*ईर्शाद शेख* – वेळागरचे ग्रामस्थ म्हणून मत मांडले
वेंगुर्ला-सावंतवाडीतील गावं सिडकोला देण्यात आल्याचा GR 4/3/24 रोजी शासनाने काढला असून सरपंचांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले आहे. यात मठ, वायंगणी तुळस, अणसूर, मोचेमाड, भोगावे, कोचरे, म्हपण, आजगांव, धाकोरा, कोंडुरे, सातार्डा इ. ही गावं सिडकोकडे देण्यासाठी आली आहेत. मात्र हे करत असताना येथील ग्रामस्थांचे मत विचारात घेतले का? शासनाने परस्पर निर्णय विचारण्याची गरज होती
*वकिल भरत प्रभू-* संयमाने कृती करण्याची गरज. 50 वर्षांसाठी सरकारने सदर कंपन्यांना जमीन लीजवर दिली आहे. स्वामित्व रक्कम ठरवलेली आहे. परिस्थिती शेवटच्या स्टेजला आहे. मायनिंग सुरू करण्यासाठी उद्योग, उर्जा मंत्र्यांची सही आवश्यक.
मायनिंग मान्यता रद्द करणं राज्याच्या उद्योगमंत्र्यांच्या हातात आहे. त्यांच्या सहिशवाय मायनिंग लीज रद्द होत नाही. सुरू होण्यापूर्वी मायनिंग रद्द होणं शक्य आहे. जिल्ह्यातील आमदार खासदार जनतेप्रती संवेदनशील नाही.
आता लढ्याची पुढची दिशा म्हणून हरित लवादकडे दाद मागणे हाच उपाय, कोर्टाशिवाय आपण मायनिंग थांबवू शकत नाही.
सिंधुदुर्गातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या सभेत मायनिंग विरोधी ठराव घेऊन आजगावातील मायनिंग विरोधी लढ्याला पाठिंबा असल्याचे कळवावे. लढ्यात जास्तीत जास्त लोकसमर्थन मिळणं गरजेचं.
विरोध कायदेशीर मार्गानेच हवा. विरोधाला न्यायिक लढ्याची गरज. समिती नेमून नोंदणी प्रक्रिया करू, आर्थिक फंड जमा करणे, हरित लवादाकडे केस दाखल करणे.
*आरवली सरपंच समीर कांबळी-* शुक्र. वेंगुर्ला पोलिस स्टेशनमधून फोन आला. शनिवारी 10 वाजता हजर रहा. मायनिंग विषयक तुमचे म्हणणे मांडा. राजकिय लोकांची मदत घ्या, मात्र त्यांना लढ्यात सहभागी करून घेऊ नका.
*सरपंच यशश्री सौदागर-* लढ्याची पुढची पायरी म्हणजे हरित लवादाकडे प्रकरण पाठवणं. संघर्ष समिती तयार करण्यात आली. शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्र्यांची भेट घेणं. जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देणार असून NOC दिली नसताना ड्रीम सर्व्हे करण्यासाठी कशी परवानगी दिली याबाबत सरपंचासह ग्रामस्थ भेटणार.
उद्या सर्व्हे करण्यासाठी आल्यावर त्यांना सर्व्हेला ग्रामस्थ विरोध करण्यासाठी उपस्थित रहाणार…
सभेशेवटी 35 ग्रामस्थांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली





